लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव - जिल्ह्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी नियमित खुली व्हावी, या मागणीचे निवेदन सोमवारी अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच जळगाव महानगर जिल्ह्याच्यवतीने नूतन मराठा महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच मु.जे.महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले.विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत असल्याचाही आरोप करून विद्यापीठ विकास मंचने शासनाच्या या भूमिकेचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी निवेदन देताना अधिसभा सदस्या मनीषा खडके, नीलेश झोपे, संजय नारखेडे, अनिल जोशी, सिद्धेश्वर लटपटे, रितेश चौधरी, आदेश पाटील, चेतन जाधव, वीरभूषण पाटील, दीपक पाटील, मानस शर्मा, रितेश महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.