जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी वाढविल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था ३१ आॅगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. मात्र विद्यापीठ व महाविद्यालयात मर्यादित कर्मचारी दैनंदिन कामासाठी आळीपाळीने उपस्थित राहतील.प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी शुक्रवारी परीपत्रक निर्गमित केले असून त्यामध्ये ३१ आॅगस्ट पर्यंत राज्य शासनाच्या निदेर्शानुसार टाळेबंदीचा कालावधी वाढविला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.शिक्षकांनी या काळात घरी राहून काम करावे व संशोधकांनी आॅनलाईन कंटेन्ट विकसित करणे, आॅनलाईन अध्यापन व मूल्यमापन, पुढील शैक्षणिक वषार्साठी शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेखा संदर्भात कार्यवाही करणे, प्रश्नसंच तयार करणे, नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करणे तसेच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करुन जाहीर करणे, आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज करणे, आयक्युएसी संदभार्तील कामे करणे आदींसाठी हा काळ उपयोगात आणावा असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एमकेसीएल पुणे या संस्थेशी केलेल्या करारांतर्गत डिजीटल युनिर्व्हसिटी डिजीटल कॉलेज पोर्टल वर लॉगीन मध्ये नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या विविध सुविधा तसेच आॅनलाईन प्रवेशा संदर्भात आॅनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेसाठी दि. ४ ते ८ आॅगस्ट याकालावधीत कॉलेज संकेतांकानुसार आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी या प्रशिक्षात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.
३१ आॅगस्टपर्यंत विद्यापीठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:43 PM