भालोद, ता.यावल, जि.जळगाव : मराठी भाषा ही केवळ विचारांच्या आदान-प्रदानाचे माध्यम नसून, सुसंस्कृत परिपूर्ण असा माणूस घडविणारे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अजय कोल्हे यांनी केले.कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने भाषा संवर्धन पंधरवाडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा आपली मातृभाषा कशी आहे याचे उदाहरणासह स्पष्टीकरण करून त्यांनी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य कृतीचा अभ्यास, वाचन केल्यास मराठी भाषा आणि संस्कृतीचा अधिक प्रसार आणि प्रचार होईल, असे सांगितले.यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.जतीन मेढे यांनी मराठी भाषेचा सांस्कृतीक वारसा विद्यार्थ्यांना सांगितला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.दिनेश पाटील यांनी या सप्ताहाच्या आयोजनामागची शासनाची भूमिका विशद करून आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.वर्षा नेहेते, प्रा.दिनेश महाजन, प्रा.सुनील नेवे, प्रा.के.जी.चौधरी, प्रा.पी.ए.सावळे, प्रा.आशुतोष वर्डीकर, प्रा.गणेश चौधरी, प्रा.प्रमोद चौधरी, प्रा.दिगंबर खोब्रागडे आदींसह विद्यार्थी व शिक्षकेतर उपस्थित होते.
मराठी भाषा माणूस घडविणारे विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:19 PM
मराठी भाषा ही केवळ विचारांच्या आदान-प्रदानाचे माध्यम नसून, सुसंस्कृत परिपूर्ण असा माणूस घडविणारे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अजय कोल्हे यांनी केले.
ठळक मुद्देभालोद येथे कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने भाषा संवर्धन पंधरवाडा सप्ताहप्रा.ए.एस.कोल्हे यांचे मार्गदर्शन