जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी आयडी) क्रमांक घेणे आवश्यक आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि ऐच्छिक विषयांतील श्रेयांकांच्या हस्तांतरासाठी हा आयडी महत्त्वाचा ठरणारा असून, या नोंदणीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. एबीसी पोर्टलवर महाराष्ट्रातील १८६ संस्थांची नोंदणी आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने ट्विट करत देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना एबीसी आयडीच्या आधारे गुणदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी संस्थांना एबीसी पोर्टलवर नोंदणी करावी करायची आहे. या पोर्टलवर स्वत:चे अकाऊउंट उघडलेल्या विद्यार्थ्यांना एबीसी आयडी मिळणार आहे. एबीसी पोर्टलवर आतापर्यंत महाराष्ट्रातून १८६ शिक्षणसंस्थांची नोंद झालेली आहेत. यामध्ये केंद्रीय विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, खासगी विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालय, राज्य विद्यापीठ, केंद्रीय शिक्षण संस्था व इतर शिक्षण संस्थांचा समावेश आहे. एबीसी आयडी म्हणजे काय?विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले श्रेयांक (क्रेडिट) एबीसी आयडीच्या माध्यमातून ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहेत. विद्यार्थ्याला जेव्हा पदवी प्राप्त करायची असेल, तेव्हा शैक्षणिक संस्था या श्रेयांकाचा वापर करतील.
अशी आहे आकडेवारी विद्यापीठ - एबीसी अकाउंट१) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - ६,११,१०६२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - ५,३०,०१८३) मुंबई विद्यापीठ - ४,८७,३०९४) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - १,७६,७३५५) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - १,५४,५९२ असे उघडा एबीसी अकाउंटविद्यार्थ्यांना https://www.abc.gov.in या पोर्टलवर खाते उघडायचे आहे. तेथे गेल्यावर माय अकाउंट टॅबवर क्लिक केल्यावर स्टुडंट व युनिव्हर्सिटी हे दोन पर्याय दिसतील. विद्यार्थ्यांनी यापैकी स्टुडंट हा पर्याय निवडून नोंदणीची प्रक्रिया सुरू करावी. यामध्ये ओटीपी येणार असल्याने मोबाइल सोबत ठेवावा.