लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : तालुक्यातील गांधली येथील सोमा संपत महाजन यांच्या शेतात असलेला ९५ क्विंटल मका अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याची घटना १८ रोजी मध्यरात्रीनंतर झाली. या घटनेत शेतकºयाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.गांधली येथील सोमा संपत महाजन यांचे गट नंबर २४५/२ या भागात एक हेक्टर ७६ आर या स्वमालकीच्या गांधली शिवारातील शेतात चालू वर्षात मका पेरला होता. गेल्या ३ रोजी मक्याची कणसे मोडून शेतात त्याचा ढिगारा करून ठेवला होता. काही दिवस खराब वातावरणामुळे मक्याच्या कणसांच्या ढिगारा प्लॅस्टिक कागद व ताडपत्री टाकून त्यांनी झाकून ठेवला होता. १७ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात कणसांचा हा ढिग व्यवस्थित होता.सोमा महाजन हे रात्री उशिरापर्यंत शेतात होते. त्यानंतर ते घरी परले. मध्यरात्रीनंतर मात्र अनर्थ घडला. १८ रोजी सकाळी आठ वाजता मका काढण्यासाठी ते थ्रेशर मशीन घेऊन शेताकडे गेले असताना संपूर्ण मक्याच्या ढिगाºयाला आग लागल्याने तो जळून खाक झाला होता. लावलेल्या या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचा ९५ क्विंटल मका ताडपत्री सह जळून खाक झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कणसांच्या ढिगाºयाच्या ठिकाणी फक्त राख शिल्लक राहिल्याचे पाहून सोमा महाजन यांना धक्का बसला.आगीचा पंचनामाघटनेच्या माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. कृषी सहाय्यक अनिता सोनवणे, तलाठी स्वप्नील कुलकर्णी, पोलीस पाटील प्रताप संदानशिव, ग्रामसेवक पवन वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.सोमा महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला आगीची नोंद केली आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.
अज्ञात समाजकंटकाने शेतकऱ्याचा ९५ क्विंटल मका जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 6:39 PM
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील सोमा संपत महाजन यांच्या शेतात असलेला ९५ क्विंटल मका अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याची घटना १८ रोजी मध्यरात्रीनंतर झाली. या घटनेत शेतकºयाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देशेतकºयाचे दोन लाखाचे नुकसानअमळनेर तालुक्यातील गांधली येथील घटनाकणसाच्या जागी राख पाहिल्यानंतर शेतकºयाला धक्का