कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निर्बंध हटविण्यात आल्याने सर्वत्र गर्दी पाहण्यास मिळत आहे. जणू कोरोना गेला, अशी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. गावात, बाजारपेठेत, महामार्गावर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. दुकानावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ही प्रशासन पुढे येताना दिसून येत नाही. एकंदरीत चित्र पाहून कोरोना परत फिरून तर येणार नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
दि. ९ रोजी दुचाकी वा पायी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई राबवित दंडात्मक कारवाई झाली, पण या कारवाईत सातत्य राहिले पाहिजे, तर लोकांमध्ये कारवाईची भीतिपोटी ते बाहेर पडताना मास्कचा वापर करतील. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे यांनी एका बाजूला विनामास्क कारवाई करताना, दुसऱ्या बाजूला मात्र सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब, गरजू, अपंग व्यक्तींना स्वखर्चाने मास्क विकत घेऊन त्यांना मास्क दिलीत. यामुळे पोलिसांनी माणुसकी जोपासली, याने सुनील साळुंखे यांचे या बाबतीत कौतुक करण्यात आले.
===Photopath===
090621\09jal_9_09062021_12.jpg
===Caption===
पारोळा येथे पोलीस कॉन्स्टेबल सुनिल साळुंखे हे अपंग व्यक्तीला मास्क वाटप करताना.