भुसावळ : रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आयोजित कोरोना भगाओ अभियाना अंतर्गत कोरोना भगाओ' चित्ररथाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक भागवत प्रमुख अतिथी होते.हा चित्ररथ दृकश्राव्य माध्यमातून साध्या सरळ भाषेत कोरोनापासून बचाव करणे तसेच आजार झाल्यावर करायच्या उपाययोजना याबाबत भुसावळ व परिसरात फिरून जनतेला माहिती देणार आहे. रोटरी क्लबचे लोकोपयोगी उपक्रम कौतुकास पात्र आहेत व यापुढेही असेच उपक्रम कायम ठेवावेत, असे गौरवोद्गार डीवाय. एस.पी. राठोड यांनी याप्रसंगी काढले, तर आमदार संजय सावकारे यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला जनतेची साथ मिळाल्यास हा आजार लवकर आटोक्यात येईल. त्यासाठी रोटरीचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, अशी आशा व्यक्त केली.सूत्रसंचालन सोनू मांडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले. या कार्यक्रमास रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शाह, ब्रँच मॅनेजर योगेश लुंकड, विशाल कदम, रोटरी रेल सिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.
भुुसावळ येथे ‘कोरोना भगाओ’ चित्ररथाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 3:45 PM
रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आयोजित कोरोना भगाओ अभियाना अंतर्गत कोरोना भगाओ' चित्ररथाचे अनावरण करण्यात आले.
ठळक मुद्देरोटरी रेल सिटीचा उपक्रमकोरोनाविषयी सोप्या भाषेत मिळणार माहिती