भडगाव : येथील नगरपरिषदेच्या शेठ बक्तावरमल चोरडिया अभ्यासिकेत सरस्वती व शेठ बक्तावरमल चोरडिया यांच्या प्रतिमेचे अनावरण व पुस्तकांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक शांताराम पाटील, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, सुशिला पाटील आदी उपस्थित होते .
६१ वर्षांनी हेतू साध्य
१९६० साली शेठ बक्तावरमल चोरडिया यांच्या मुलांनी ही जागा वाचनालयासाठी दिली होती. आज ६१ वर्षांनी वाचनालयाची भव्य इमारत उभी राहिली आहे. यासाठी सचिन चोरडिया यांनी पाठपुरावा केला. सचिन चोरडिया, आनंद जैन, नंदलाल ललवाणी यांनी अभ्यासिकेसाठी भरीव मदत केली आहे. यावेळी चोरडिया परिवाराकडून वाचनालयात ५० हजारांची अनेक स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्यात आली.
सुरुवातीला सचिन चोरडिया व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविकात कामाची माहिती दिली. ईशस्तवनपर सरस्वती स्तोत्र पौर्णिमा चोरडिया यांनी सादर केले, तर सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले. आभार सचिन चोरडिया यांनी मानले.