यावेळी चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिसमध्ये २१ जून रोजी येणाऱ्या सर्व टपालावर या विशेष शिक्क्याने टपाल छायांकित केला जाणार आहे. या तिकिटावर आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१ ग्राफिकल डिझाईन्स विशेष संकेत करण्यात आले आहेत व हे कॅन्सल झालेले टिकीट पुन्हा वापरले जाणार नाही. यामुळे तिकिटाचा पुन्हा-पुन्हा वापर टाळला जातो. असे शिक्के म्हणजे मौल्यवान संग्रह आणि फिलेटेलिक अभ्यास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत दुर्मीळ असा प्रकार आहे.
ज्यांना तिकीट संकलनाची आवड आहे, अशांसाठी ही एक पर्वणीच आहे. असे तिकीट संकलन करणाऱ्या ज्यांना आवड आहे, त्यांनी कोणतीही पोस्ट ऑफिसात दोनशे रुपयांनी खाते उघडून नवनवीन प्रकारचे फिलेटेलिक ब्युरो मार्फत आलेले तिकिटे जमा करू शकतो.
आंतरराष्ट्रीय योग दिन दिवस गेल्या सहा वर्षभरात जगभरात अनेकदा असे सर्जनशील प्रकारे साजरा केला जात आहे. भारतात अशा योग दिनाच्या दिवशी अनोख्या उत्सवाचे चित्रण केले जाते. यामध्ये भारतीय सैन्य कर्मचारी अधिकारी आयएनएस विराट योग करणारे कँडिडेट वाळू शिल्प इत्यादी योगासने करणारे भारतीय नौदलाचे अधिकारी यांचा समावेश असतो. या तिकिटाचे ८०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी कॅन्सलेशन होणार आहे.