ऑनलाईन लोकमत बाळद, ता.पाचोरा, जि.जळगाव, दि.23 : कूकरचा स्फोट होऊन त्यात युवकाच्या डोक्यात कूकरची शिट्टी घुसली. त्यात युवक गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा डोया निकामी झाला आहे. बाळद येथे 21 रोजी सकाळी नऊला ही घटना घडली. या युवकाच्या मदतीसाठी गावातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी लोकवर्गणी जमा करून एकतेचे दर्शन घडविले. बाळद येथील शेख गुलाब शेख जैनोद्दीन यांचा 25 वर्षीय मुलगा शेख रफीक शेख रज्जाक हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. 21 रोजी सकाळी घरात स्वयंपाक सुरू होता. गॅसवर ठेवलेल्या कूकरची शिट्टी होत नव्हती. ती का होत नाही, हे पाहण्यासाठी तो गॅसलगत गेला. तेव्हा अचानक कूकरचा स्फोट झाला आणि कूकरची शिट्टी शेख गुलाब शेख जैनोद्दीन याच्या नाकाला स्पर्श करीत उजव्या डोळ्यातून डोक्यात घुसली. यात त्याचा उजवा डोळा निकामी झाला आहे. गंभीर अवस्थेत त्याला जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पुढील उपचारासाठी मुंबईत जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार, मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून कूकरची शिट्टी डोक्यातून काढण्यात यश मिळविले.
पाचोरा तालुक्यात बाळद येथे कूकरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 8:06 PM
कूकरची शिट्टी शिरली युवकाच्या डोक्यात, डोळा निकामी
ठळक मुद्देशेख गुलाब शेख जैनोद्दीन याच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्याजवळ उपचारासाठीदेखील पैसे नव्हते. तेव्हा गावातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी लोकवर्गणी करून 25 हजार रुपये जमविले व पुढील उपचारासाठी पाठविलेया युवकाचे चार वर्षापूर्वी लगA झाले असून, त्याला दोन मुले आहेत. हा युवक घरातील कर्ता पुरुष आहे. त्याचा मोठा मुलगा हा अर्धागवायू झाला आहे.