जळगाव : विज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम विज्ञान लेखनावर देखील होताना दिसत आहे. विज्ञानामुळे अनेक नवीन शब्द तयार होत आहेत. त्या शब्दांना मराठी भाषेत नवीन शब्द मिळत नाही. यामुळे त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखनात होत आहे. विज्ञान लेखन करताना भाषा महत्वाची नसून जे शब्द वाचकांना समजतील त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखनात करण्यात यावा असा सूर तिस:या विज्ञान साहित्य संमेलनात आयोजित ‘विज्ञान लेखन’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी लेखकांकडून उमटला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या जगदिशचंद्र बोस सभागृहात तिस:या विज्ञान संमेलनाच्या दुस:या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘विज्ञान लेखन’ या विषयावर चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील अ.पां.देशपांडे होते.चर्चासत्रात सोलापूर येथील प्रा.राजाभाऊ ढेपे, सांगलीचे प्रा.मोहन मव्दाण्णा, मुंबई येथील डॉ.विवेक पाटकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.एल.पी.देशमुख आदी सहभागी झाले होते. चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाव्दारे आपले विषय मांडले. त्या प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात आली. विज्ञानाने मराठी भाषेला नवीन शब्द दिलेसध्याचा काळात विज्ञानामुळे अनेक नवीन शब्द तयार होत आहेत. ज्या शब्दांना मराठी भाषेत दुसरा शब्द उपलब्ध नाही. विज्ञान लेखनात किंवा मराठी भाषेचा लेखनात हे शब्द वापरले जात आहे. या शब्दांचे उदाहरण देखील या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आले. तर मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विज्ञान लेखनात मराठी भाषेचा वापर करण्याची गरज असल्याचे मत चर्चासत्रात उपस्थित काही लेखकांनी मांडले. आवड निर्माण कराचर्चासत्राचे अध्यक्ष अ.पां.देशपांडे म्हणाले की, विज्ञान लेखन करताना वाचन करणा:याला ते समजेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. विज्ञानाबद्दल नवीन पिढीला आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान लेखन करताना ते रंजक पध्दतीने मांडण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर विज्ञानाबाबत काहीवाहिन्यांकडूनमोठय़ा प्रमाणात गैरसमज पसरविले जात असून हे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काही दाखलेही दिले. गणिताच्या सखोल अभ्यासाची गरजडॉ.विवेक पाटकर ‘गणित विज्ञान’ या विषयावर म्हणाले की, गणिताचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. ज्या विद्याथ्र्याला गणिताच्या या भागात जावू नको असे आपण सांगतो. तोच विद्यार्थी त्या विषयात सर्वाधिक गुण मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी गणिताच्या विविध प्रकारांची माहिती देखील यावेळी दिली.प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख वनस्पतीशास्त्रावर म्हणाले, आदिवासी समाज वनस्पती शास्त्राची जतन करणारा समाज असून, विज्ञान लेखन करताना त्यांच्यावर देखील लेखन करण्याची गरज आहे.
वाचक कोण हे लक्षात घेवून भाषेचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2017 12:30 AM