भुसावळ, जि.जळगाव : प्लॅस्टिकवर बंदी असताना शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या पथकाने शुक्रवारी तीन दुकानांवर अचानक कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील एका दुकानावर कारवाई करीत असताना, एका माजी नगरसेविकेच्या पतीने विरोध केला. तेव्हा कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार द्या, अशी सूचना मुख्याधिकाºयांनी केल्यानंतर संबंधितांनी काढता पाय घेतला. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.राज्य शासनाने नुकतीच प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे . या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास होत असला तरी त्याचे प्रदूषण व स्वच्छतेबाबत सकारात्मक परिणाम दिसत आहेत. मात्र शहरात पुन्हा प्लॅस्टिकचा वापर दिसून येत असल्यामुळे मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी विद्युत विभागाचे अभियंता सुरज नारखेडे, आरोग्य विभागाचे प्रदीप पवार, वसंत राठोड, प्रभारी आरोग्य अधिकारी निवृत्ती पाटील, भागवत पाटील, सतीश पेंढारकर आदींच्या पथकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.पथकाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील पालिका दवाखान्याजवळील दत्त बेकरी, मांजिनीअस दुकान व छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील भरकादेवी डेअरी या तीन ठिकाणी ठिकाणी कारवाई करून प्रत्येक दुकानदारांकडून पाच हजार रुपयांप्रमाणे १५ हजार रुपये दंड वसूल केला.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील भरकादेवी येथे कारवाई करीत असताना येथे एका माजी नगरसेविकेच्या पतीने कारवाईस विरोध केला. अगोदर शहरातील धनदांडग्यांच्या दुकानावर कारवाई करा. त्यानंतरच या दुकानांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. या माजी नगरसेविकेच्या पतीची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी घेतलेल्या पवित्र्यावर ते ठाम राहिले. स्अर्धा तास हुज्जत घातली. शेवटी पथकाने मुख्याधिकारी दोरकुळकर यांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे मुख्याधिकाºयांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे मुख्याधिकाºयांनी त्यांना शासकीय कामात अडथळा आणू नका, अशी समज दिली. त्यानंतर मात्र माजी नगरसेविकेच्या पतीने दुकानावरून काढता पाय घेतला. यावेळी दुकानाच्या जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. शेवटी पथकाने या दुकानावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली.शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातल्यापासून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मात्र पुन्हा काही प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसून येत आहेत. यामुळे पालिकेच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई काही दिवस सुरूच राहणार, असल्याची माहिती मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दिली . दरम्यान, या कारवाईमध्ये एका नगरसेविकेच्या पतीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. मात्र आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर त्यांनी विरोध करणे सोडले, असे त्यांनी सांगितले.
भुसावळात प्लॅस्टिकचा वापर, तिघा दुकानदारांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:00 AM
स्टिकवर बंदी असताना शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या पथकाने शुक्रवारी तीन दुकानांवर अचानक कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील एका दुकानावर कारवाई करीत असताना, एका माजी नगरसेविकेच्या पतीने विरोध केला. तेव्हा कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार द्या, अशी सूचना मुख्याधिकाºयांनी केल्यानंतर संबंधितांनी काढता पाय घेतला.
ठळक मुद्देपालिकेची धडक कारवाईमाजी नगरसेविकाच्या पतीस मुख्याधिकाºयांनी दिली समजमुख्याधिकारी म्हणतात, कारवाई सुरूच राहणार