कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यात दळणवळणाचे ठिकाण असलेले विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थावक या ठिकाणीदेखील दक्षता घेतली जात आहे. यामध्ये शुक्रवारी विमानतळावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लसीकरण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, विकास धनगर, प्रदीप पाटील, आकाश सोनवणे उपस्थित यांनी कर्मचाऱ्यांना लसीकरण व औषधी देऊन मार्गदर्शन केले. यावेळी ५९ कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस व पाच कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेत अशा एकूण ६४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी २९ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यात आले होते. त्या वेळी व आताचे मिळून एकूण १२६ कर्मचाऱ्यांनी पहिला लसीचा डोस घेतला असून ४९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.