जळगाव : जळगाव शहरातील केंद्रावर कोविशिल्ड लसीचेही डोस संपल्यामुळे लसीकरणाचे सर्वच केंद्र बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसीचे ४७०० डोस हे मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता असून बुधवारपासून हे केंद्रावर उपलब्ध होतील.
काेविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोस मध्ये अंतराचे नवे नियम लागू केल्याने जळगावात सोमवारी केवळ २ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचीच दुसऱ्या डोससाठी नागरिकांना प्रतिक्षा असून कोव्हॅक्सिन नेमके डोस येणार कधी हे अनिश्चित असून कोविशिल्डच्या तुलनेत ते अत्यंत कमी येत आहेत. रविवारी आलेले डोस एकाच दिवसात दुपारपर्यंत संपले होते. दरम्यान, मंगळवारी महापालिकेच्या केंद्रांसह रेडक्रॉस आणि रेाटरी हे अशी सर्वच केंद्र लस उपलब्ध नसल्याने बंद राहणार आहेत. महापालिकेचे केंद्र बंद राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.