पुरस्कार रखडले
जळगाव : काेविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून स्मार्ट ग्राम पुरस्कार वितरण साेहळाही रखडला आहे. रुग्णसंख्या वाढण्याआधी कार्यक्रमाचे नियोजन न झाल्याने अखेर ग्रामसेवक पुरस्कारांसारखीच या पुरस्कारांचीही गत झाल्याचे बोलले जात आहे.
लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष
जळगाव : वीस ग्रामपंचयायतींचे लेखापरीक्षण नसल्याची बाब मध्यंतरी समोर आली हेाती. मात्र, यासाठी वरिष्ठांकडून तपासणीही सुरू करण्यात आली होती. मात्र, पुन्हा याकडे दुर्लक्ष झाले असून ही बाब रखडली आहे. यात जळगाव तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचाायतींचा समावेश आहे. त्यामुळे लेखापरीक्षण कधी होणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
जि.प.त जाणे अवघड
जळगाव : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पूर्ण रस्ता खोदण्यात आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जि.प.त जाणे अवघड झाले आहे. यात अलेकांनी पर्याय नसल्याने रस्त्यावरच वाहने लावली हेाती. यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत होती. जि.प.च्या नवीन इमारतीत जाण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्यथा मार्ग बदलून यावे लागत आहे.
८३७ जणांनी घेतली लस
जळगाव : जिल्ह्यात ८३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. एकूण लस घेतलेल्यांची संख्या ९८,६४६ वर पोहोचली आहे. तर १७६ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. ही संख्या १४,१४९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात काही नवीन केंद्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. तातडीने लसीकण व्हावे, यासाठी केंद्रे वाढविण्यावर भर दिला जात आहे.