लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रविवारीही लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ एक परिचारिका आणि एक डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यावरच ही लसीकरणाची प्रक्रिया सुरू होती. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी साडेचार वाजेपर्यंत ३८ जणांचे लसीकरण झालेले होते. तीन ते चार महिलांनी लस घेऊन त्या निरीक्षण कक्षात न थांबता प्रतीक्षालयात काही वेळ थांबल्या. त्यांच्यावर निरीक्षणासाठी या ठिकाणी डॉक्टर नव्हते. या आधी आलेल्या काही महिला व कर्मचारी दहा ते पंधरा मिनिटे थांबून निघून गेले होते. रविवार असल्याने लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.