लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मंगळवार आणि बुधवारी लसींच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. मात्र बुधवारी सायंकाळी ७ हजार १७० डोस जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध झाले. त्यात कोव्हॅक्सिनचे २३३० तर कोविशिल्डचे ४८४० डोसचे वितरणदेखील करण्यात आले आहे. त्यानंतर आता गुरुवारी जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रे सुरू होतील. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्ध असणार आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण ठप्प झाले होते. नवीन डोस मिळत नसल्याने बुधवारी शहरात फक्त ४१ जणांना लस देण्यात आली. तर जिल्हाभरात १६६ जणांना लस दिली. त्यात पारोळा ६५, भुसावळ ६० आणि जळगाव ४१ असा समावेश आहे. इतर सर्व तालुक्यांमध्ये लसीकरण पूर्ण बंद करण्यात आले होते.
शहरातील लसीकरण केंद्रे होणार सुरू
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे चालवली जाणारी सर्व लसीकरण केंद्रे गुरूवारी सुरू होणार आहेत. त्यात स्वाध्याय भवन, गणपती नगर व कांताई नेत्रालय निमखेडी रोड येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेल तर छत्रपती शाहु हॉस्पिटल, डी.बी.जैन रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, मुलतानी हॉस्पिटल, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, चेतनदास हॉस्पिटल येथे कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
लसींचा केंद्र निहाय वाटप
जिल्हा रुग्णालय, रोटरी भवन, रेडक्रॉस - कोविशिल्ड ६००
जामनेर उपजिल्हा रुग्णालय कोविशिल्ड ३००- कोव्हॅक्सिन - १००
चोपडा रुग्णालय कोविशिल्ड ३००
मुक्ताई नगर रुग्णालय कोविशिल्ड ३००
चाळीसगाव रुग्णालय कोविशिल्ड ३००, कोव्हॅक्सिन १००
पारोळा ग्रामीण रुग्णालय कोव्हॅक्सिन ३०
अमळनेर ग्रामीण रुग्णालय कोविशिल्ड ३००
पाचोरा ग्रामीण रुग्णालय कोविशिल्ड ३००
यावल ग्रामीण रुग्णालय कोव्हॅक्सिन १००
भुसावळ रेल्वे रुग्णालय कोव्हॅक्सिन १००
धरणगाव ग्रामीण रुग्णालय कोविशिल्ड ३००
भुसावळ न.पा रुग्णालय कोव्हॅक्सिन २००
जळगाव मनपा रुग्णालये कोविशिल्ड २०००, कोव्हॅक्सिन ९००
ग्रामीण रुग्णालय पाल कोव्हॅक्सिन १००
पिंपळगाव हरेश्वर रुग्णालय कोव्हॅक्सिन १००
पहुर ग्रामीण रुग्णालय कोव्हॅक्सिन १००
अमळनेर शहर प्राथमिक आरोग्य केंद्र कोव्हॅक्सिन ५०
न्हावी ता. यावल कोव्हॅक्सिन १००
सावदा ता. रावेर कोविशिल्ड ४० कोव्हॅक्सिन १५०
वरणगाव कोव्हॅक्सिन १००
तामसवाडी ता. पारोळा, कोविशिल्ड १००