आता बरे घरीच्या घरी । आपली उरी आपणापे ।। १।।हे विश्वचि माझे घर! या संतवचनाप्रमाणे संपूर्ण विश्वाला घरी बसणे हा एकच पर्याय सध्या कोरोना नावाच्या दृष्टिक्षेपात न येणाऱ्या परंतु प्रत्यक्ष प्राणघातक ठरणाºया विषाणूने आणली आहे. मानवी जीवन, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या पंचसूत्रीला बांधील आहे. कुठलाही समाज जोवर निरोगी नाही तोवर कुठलेही काम व्यवस्थित व उपयोगाचे ठरू शकत नाही. कारण आपल्या शरीरात राहणारे निरोगी बॅक्टरिया व रोगांची बॅक्टरिया यात झालेल्या चकमकीत प्रतिकारशक्ती निर्माण करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. साधारणत: १९७५ पासून असे रोग, विषाणू उद्भवत आहेत की, ज्यांचा पूर्वी कुठेही उल्लेखही नव्हता. पण हे रोग येतात कुठुन हा संशोधनाचा मुद्दा आहे. संसर्गजन्य रोगांचे विशेषज्ञ म्हणतात की, जवळ जवळ सर्व संसर्गजन्य रोग जनावरांशी जास्त संपर्क आल्यामुळे होतात. मनुष्याचा मनुष्याशी वाढणारा संपर्क त्यात टीबी हा रोग शेळी, मेंढी यांच्या अति संपर्कातून २० व्या शतकात आला. गोवर आला तो गायी पाळल्यामुळे, गायीतील बोवाईन रिण्डरपेस्ट व्हायरसचा एक वेगळा प्रकार आहे. अर्थात गायीला गोवर होत नाही. महारोग पाणघोड्यामुळे तर सर्दी घोड्यामुळे आली. ‘कोरोना’ हा कसा झाला यात मतेमतांतरे आहेत. पण वटवाघुळमध्ये आढळणारा विषाणू माणसात आला, त्याला जागतिक आरोग्य संघटेनेने ‘कोविड-१९’ असे नाव दिले.आता यावर भौतिक, दैविक, आध्यात्मिक एकच पर्याय आहे, तो म्हणजे आहात त्या ठिकाणी थांबणे! पूर्वी थांबला तो संपला असे म्हटले जायचे, परंतु आज मात्र थांबला तो जिंकला अशी परिस्थिती आहे. त्यावरचा आध्यात्मिक उपाय म्हणजे - वैद्य एक पंढरीराव । अंतर्भाव जाणे तो ।।पथ्य नाम विठोबाचे ।। भगवान पंढरीधिश पांडुरंग हाच एकमेव वैद्य आहे की, जो आपल्याला या भीतीतून काढू शकेल. कारण माणूस भीतीने ग्रस्त झालाय.श्रीमंताला गरिबीची भीती, सौंदर्यवानाला म्हतारपणाची भीती विद्वानाला आडदांड प्रश्न विचारणाºयाची भीती, धनवानाला चोरांची भीती, ठरावीक भीती आहे परंतु मला मरणाची भीती नाही असा जगात शोधूनही सापडणार नाही. अशा परिस्थितीत मानवाने- ठायीची बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा।।प्रभुचिंतन हाच मानवी कल्याणाचा मार्ग आहे. एक दृढविश्वास मनात रुजविला पाहिजे की, जर एक न दिसणारा अप्रत्यक्ष विषाणू माणसाला मारु शकतो ही चिंता असेल तर न दिसणारा परमात्मा परमेश्वर माणसाला वाचवू श्कतो, हे चिंतन आहे. सर्वांनी विनंती इतर रोग माणसांच्या संसर्गातून संक्रमित होतात. पण हा रोग अगोदर आजारी नसलात, तरी त्यांचे संक्रमित, संवाहक ठरू शकतात. आपल्या देशाचा सारासार विचार करता घरात थांबणे हाच एक उत्तम पर्याय आहे.तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ।। याप्रमाणे शासन, प्रशासन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनावर मात करु या.नामाचे चिंतन प्रगट पसाराअसाल ते करा जेथे तेथे- ज्ञानेश्वर महाराज, जळकेकर
वैद्य एक पंढरीराव....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 9:56 PM