जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेकरीता १ लाख ४३ हजार ८३२ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी १ लाख १२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ४३७०५ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी १८३३ शेतकºयांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वय अरुण प्रकाश, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, काही शेतकºयांना अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकºयांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकºयाचा विशेष क्रमांकही सादर करावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.शेतकºयाकडून उकळले जाताहेत पैसे, पिळवणूक होत असल्याची तक्रारशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या अहेत.कर्जमुक्ती योजनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात याद्या जाहीर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकºयांना आपल्या बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे जरुरीचे आहे. यामुळे शासनाने काम करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू केले आहेत. जेणेकरून शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नुकतेच शेतकºयांना या कामासाठी कुठलीही रक्कम न देण्याचे सांगितले. तसेच सीएससी चालकांनाही शेतकºयांकडून रक्कम न घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असे असतानादेखील सीएससी चालकांडून जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला शहरासह ग्रामीण भागात केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे.शहरात एक - दोन सेंटर वगळता सर्वच सेंटर चालकांकडून आधार प्रमाणीकरणासाठी शेतकºयांकडून ५० रुपये फी वसूल केली जात आहे. तर ग्रामीणमध्ये फीचा हाच आकडा ७० रुपये ते १०० रुपये एवढा जास्त आहे. यामुळे शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे.
सव्वालाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:34 PM