बहादरपूर, ता.पारोळा, जि.जळगाव : येथील रहिवासी तथा रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर, ता.पारोळा येथे वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याचा नवीन वर्षात संकल्प केला आहे. यासाठी लोकांकडून मदत म्हणून ४० दिवस मौन पदयात्रा त्या काढणार आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी केला. ही पदयात्रा खान्देशात निघेल.समाजकारणातून बहादरपूरचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्या नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर येथे भव्यदिव्य असा वानप्रस्थ आश्रम उभारण्याचा मानस केला आहे. अनाथ निराधार वृद्ध महिला यांच्यासाठी भरीव कार्य करण्याच्या त्यांच्या हा संकल्प आहे. यासाठी लागणारी देणगी लोकांकडून उभी राहावी म्हणून मिश्रा यांंनी खान्देशात ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक गावात त्या जात आहेत. बहादरपूर, शिरसोदे, महालपूर, शेवगे, कंकराज, भिलाली असा हा पूर्ण परिसर त्या फिरतील. यादरम्यान त्यांनी मौन धारण केले आहे. आजपर्यंत शासनाचा एक रुपयाही अनुदान म्हणून त्यांनी घेतलेले नाही. मात्र आबालवृद्ध, महिला, तरुण, ज्येष्ठ शेतकरी ,कष्टकरी कामगार तरुण-तरुणींच्या हाताला काम देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. बचत गटामार्फत बहादरपूर स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आहे. समाजासह परिसरात वावरत असताना अनाथ, दलितांची सेवा व्हावी म्हणून अनाथ आश्रमसुद्धा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.समाजाचे आपण देणे लागतो यातूनच त्यांंनी आजपर्यंत समाजकार्य केले आहे. समाजकायात एक मोठे पाऊल त्या उचलत असून याला हातभार लावण्यासाठी गावकरीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने पुढे येत आहेत. स्वत:हून लोक नीलिमा मिश्रा यांच्या आश्रमाला देणगी देत असून, परिसरात प्रत्येक गावात त्यांचे स्वागत होत आहे.त्यांच्या या कार्यात भगिनी ग्रामीण विज्ञान निकेतन संस्था व संस्थेचे सर्व सदस्य ,संचालक, त्यांच्या भगिनी पूनम अवस्थी, अमोल चौधरी, विनोद सोनार पूर्ण स्टाफ या पदयात्रेसाठी मदत करीत आहे.
बहादपूर येथे उभा राहणार वानप्रस्थाश्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 4:15 PM
रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर, ता.पारोळा येथे वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याचा नवीन वर्षात संकल्प केला आहे. यासाठी लोकांकडून मदत म्हणून ४० दिवस मौन पदयात्रा त्या काढणार आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी केला.
ठळक मुद्देनीलिमा मिश्रा यांनी केली ४० दिवसीय पदयात्रेला सुरुवातमौन पदयात्रा फिरणार खान्देशात