जळगाव : जिल्ह्यातील वरणगाव आयुध निर्माणीमध्ये गन पावडरचा स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत तीनही कर्मचारी भाजले गेले असून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
वरणगाव आयुध निर्माणीमध्ये स्फोट, तीन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 1:17 PM