यावेळी डॉ.जोशी यांनी वयाच्या चाळिशीनंतर कॅल्शिअम घेणे गरजेचे असून, स्वत:साठी वेळ काढून छंद जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच कोरोना लस विषयी गैरसमज दूर करून ही लस कशी सुरक्षित आहे,या विषयी माहिती दिली. तसेच सरकारच्या लसीकरण मोहिमेचे कौतुकही केले.
कार्यक्रमाला ज्योती भोकरडोळे, सविता नाईक, मेघा नाईक, गायत्री जोशी, वैशाली नाईक, सुनीता सातपुते, कृष्णा पांडे, कल्पना शर्मा, अर्चना शर्मा, गायत्री शर्मा उपस्थित होत्या. प्रास्ताविक बहुभाषिक ब्राम्हण महिला संघाच्या अध्यक्षा कमला पाठक यांनी तर सूत्रसंचालन वृंदा भालेराव यांनी केले. तसेच आभार सुधा खटोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी उषा पाठक, स्वाती कुलकर्णी, स्वप्नगंधा जोशी, आसावरी जोशी, वृषाली जोशी, राजश्री रावळ, अनुराधा कुलकर्णी, छाया त्रिपाठी, संध्या कौल आदींनी परिश्रम घेतले.