डोंगर कठोरा, ता.यावल, जि.जळगाव : येथील अ.ध.चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये यावल वनविभागातर्फे १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.या सप्ताहातील कार्यक्रमांमध्ये परिसरात आढळणारे विविध प्रकारचे विषारी, बिगर विषारी साप, फुलपाखरू, पक्षी व प्राणी याविषयी मोठ्या पोस्टरवरील चित्राद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.या वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. उपवनसंरक्षक प्र.तु.मोराणकर, सहाय्यक उपवनसंरक्षक एम.डी.नेमाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (यावल पूर्व) व्ही.टी. पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर.सी. सोनवणे, वनरक्षक आय.एस.तडवी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सारंग आढळे, यमुना चौधरी, मीना भालशंकर, यमुना धांडे, नंदन वळींकार, प्रवीण कुयटे, नितीन झांबरे, आर.पी. चिमणकारे, सचिन भंगाळे, मनीषा तडवी, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.
डोंगर कठोरा येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 4:29 PM
अ.ध.चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रमपोस्टर प्रदर्शनाद्वारे मार्गदर्शन