स्व.पं. वसंत गोविंद चांदोरकर (आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराणे ) यांचा जन्म १९२० मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात तर नंतरचे शिक्षण जळगाव येथे झाले. १९२५-२६ या कालावधीत धुळ्यात एका कार्यक्रमास इंदूरच्या राणीसाहेब आल्या होत्या. त्यावेळी वसंतराव बंधूंनी रचलेले स्वागतगीत सादर करण्याची संधी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मिळाली. यावेळी पाठीवर पडलेली कौतुकाची थाप संगीत क्षेत्रात भरारी घेण्यास कामात आली. शालेय जीवनात प्रसिद्ध गायक जी.एन. जोशी यांची गाणी गायली आणि त्यांच्या मधुर स्वरांची सर्वांनाच भुरळ पडली. यानंतर त्यांचा कै. विष्णूबुवा बखले यांच्या गायन विद्या प्रसारक समाज संस्थेत प्रवेश झाला. संगीत क्षेत्रातील प्रारंभ गुरू कै. पं. रंगोपंत करकरे यांच्यामुळे ते त्यांचे प्रथम गुरू. त्यानंतर कै. दि.स. खानवाले यांच्या बरोबर यांच्या बरोबरही त्यांनी संगीताचे धडे गिरवले. शालेय जीवनापासून त्यांनी संगीत क्षेत्रातील पुरस्कार मिळविले. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी राज्यातील विविध शहरात संगीताचे कार्यक्रम सादर केले. तसेच संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. यासह विविध राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धांमध्ये संगीत भूमिकांसाठी त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. विविध आकाशवाणी केंद्रांवरही त्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत. २९ मार्च १९४९ रोजी आकाशवाणीवरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारीत झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरूवात १९ जून रोजी कांताई सभागृहात सायं. ६ वा.‘यमनरंग’ कार्यक्रमाने होणार आहे.- दीपक चांदोरकर, कार्यकारी विश्वस्त, स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान
वसंतराव चांदोरकर जन्मशताब्दी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:01 PM