आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार असून, सायंकाळी ६ वाजता कांताई सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लिमजी जळगाववाला वसुंधरा सन्मान, मित्र पुरस्कार, ग्रीन टीचर, संस्था व वसुंधरा निसर्ग पर्यटन विकास पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून, हॅरी मार्शल यांचा ‘टेंपल आॅफ टाईगर्स’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. ७ ते ९ डिसेंबरदरम्यान होणाºया महोत्सवादरम्यान १० लघुपट दाखविण्यात येणार आहे. तर निसर्ग भ्रमण, पोस्टर प्रदर्शन, शाळा-महाविद्यालयामध्ये माहितीपट व स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. मध्य भारतातील बांधवगढ व्याघ्र प्रकल्प हा अनेक शतकांपासून नाट्यमय प्रसंगासाठी प्रसिद्ध आहे. या व्याघ्रप्रकल्पात जुन्या परंपरा, संस्कृती नष्ट होतांना या आधुनिक काळात वाघांची एक नवीन पिढी या परिसरात राज्य करीत आहे, याची अत्यंत चित्तथरारक कहाणी ‘टेंपल आॅफ टाईगर्स’ या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.यांना मिळणार पुरस्कारलिमजी जळगाववाला वसुंधरा सन्मान पुरस्कार - शाहीर शिवाजीराव पाटीलवसुंधरा मित्र पुरस्कार - बाळकृष्ण देवरे, इमरान तडवी, अजय पाटीलवसुंधरा ग्रीन टिचर पुरस्कार -सुनीता महाजन, अनिल माळी, विशाल सोनकुळ, राहुल सोनवणे, प्रशांतराज तायडेवसुंधरा संस्था पुरस्कार - जळगाव फर्स्टवसुंधरा निसर्ग पर्यटन विकास पुरस्कार-डॉ. रेखा महाजन
जळगावात आजपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:05 PM
पर्यावरण विषयी उल्लेखनीय काम करणाºयांना पुरस्कार देऊन होणार सन्मान
ठळक मुद्देहॅरी मार्शल यांचा ‘टेंपल आॅफ टाईगर्स’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवातमहोत्सवादरम्यान १० लघुपट दाखविण्यात येणारनिसर्ग भ्रमण, पोस्टर प्रदर्शन, शाळा-महाविद्यालयामध्ये माहितीपट व स्पर्धांचेदेखील आयोजन