शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

By सागर दुबे | Published: April 13, 2023 4:23 PM

शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाद्वारे सन २०२२-२३ या वर्षभरात २३ हजार १२९ वाहनांवर कारवाई करून प्रथमच ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ७ कोटी ३५ लाख ४० हजार इतकी दंडाची तर १ कोटी ३८ लाख रूपये इतकी थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.पीयूसी नाही, मग दंड तर होईलच...वायूवेग पथकामार्फत सन २०२२-२३ या वर्षात लायसन्स नसणारे २१३५, परवाना नसलेले ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या ३५५८, पीयूसी नसलेल्या २९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ३९४, अवैध प्रवासी वाहतूक करणा-या बसेस १६५ तर हेल्मेट परिधान न करणारे ४४७१, सीटबेल्ट न लावणारे ११२५, वाहन चालविताना मोबाईल वापरणारे ७२२, वाहनाचा विमा नसणारे ३३३५, वेगाने वाहन चालिवणारे ११९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या १७० वाहन तर क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारे ८७८ वाहनांवर तर लाल परावर्तक नसणा-या २२८० व टपावरून मालाची वाहतूक करणाऱ्या ९३ लक्झरी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यांच्याकडून दंड वसूर करण्यात आला आहे.९२ टक्के उद्दिष्ट पूर्ण...शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी परिवहन विभागाने सन २०२२-२३ या दरम्यानात एकूण १६० कोटी ९८ लाख रूपयांचा महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे.कार नोंदणीमध्ये घटसन २०२२-२३ या वर्षात परिवहन कार्यालयात एकूण ५६ हजार ३२३ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी झालेली असून मागील वर्षीच्या तुलनेत नवीन दुचाकी वाहनांच्या नोंदणीत १० टक्कयांनी वाढ झालेली आहे. तर नवीन हलके मोटार वाहन (कार) च्या नोंदणीमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली आहे.इलेक्ट्रीक वाहन सुसाट...वाहनांच्या नोंदणीमध्ये मुख्यत: इलेक्ट्रीक वाहनांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील वर्षी नवीन २६ नवीन इलेक्ट्रीक कारची नोंदणी होवून त्या रस्त्यावर उतरल्या असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.परिवहन कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वायूवेग पथकामार्फत करण्यात आली असून महसुली वसुलीचे उद्दिष्ट देखील ९२ टक्के पूर्ण झाले आहेत.श्याम लोहीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :JalgaonजळगावRto officeआरटीओ ऑफीस