वेदातला ऋषी कलकल निनाद करणाऱ्या वेगवान सरितांना बघतो़ पर्वत प्रदेशातून धावत येणाºया या नद्या़ त्या स्वच्छ जलधारा बघून त्याचं अंत:करण उचंबळून येतं़ दूधानं स्तनभार सहन न होणाºया गाईसारख्या या सरिता़ या हंबरत येताहेत असं त्याला वाटतं़ गाई कशा स्नेह वत्सल़ नद्या कशा मातृरूपी़ ऋषी या नद्यांना विनवतो, ‘हे सरितांनो, तुम्ही मला धेनुसारख्या वाटताहात़ तुमचं जळ हे दूधाप्रमाणं़ ते आहे पावऩ ते मधुर आहे़ गाई का कधी आपल्या वासरांना सोडून वनांतरी रहातील? तशाच तुम्हीही़ तुम्ही का कधी पर्वतरांगांशिवाय राहू शकाल? तुम्ही तृषार्त लेकरांसाठी धावत येताहात़ तुम्हाला प्रमाण असो़ऋषी या नावांनी देव ओळखतो़ देव शब्दाचा अर्थही व्यापक़ सूर्य म्हणजे प्रेरणा़ जळ म्हणजे श्रद्धा़ गृहदेव म्हणजे स्थिरता़ वन देवता म्हणजे स्वातंत्र्य़ असे शब्द आणि असे अर्थ़ यजुर्वेद या शब्दाचा अर्थच तर बघा़ यजुर्वेद म्हणजे गतिशील आकाश़ यातले मंत्र पद्याच्या बंधनातून मुक्त आहेत़ याचा विषय यज्ञ़ यज्ञाचा अर्थ व्यापक़ अग्निसाठी किती विविध नावं? बघा तरी एकदा़ एक नाव आहे जातवेद़ म्हणजे उत्पन्न करण्यातला विशेषज्ञ़ एक नाव आहे पूषा़ म्हणजे पोषण देणारा़ एक नाव आहे यम़ म्हणजे अनुशासन करणारा़ अग्निचं असं दर्शन ऋषी प्रतिभेला झालं़ अग्नी हा अत्यंत मनोरम़ तो औषधंींना पोषण देणारा़ विलक्षण वर्णाच्या ज्वालांनी युक्त ़ सदा नित्य़ तो नवीन बाळकासारखा दिसतो़ तो स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी नांदतो़ तो झगमगत्या गर्भासारखा़ तो अंध:कार घालवणाºया मातेसारखा़पहिल्या अध्यायाच्या आरंभीची ही चर्चा़ अन्नाच्या प्राप्तीसाठी सवितादेवानं आपल्याला अगे्रसर करावं़ आपणास तेजस्वी बनता यावं़ आपली शक्ती विनाशकारी नसावी़ उन्नतीशील असावी़ चोर आपले निर्धारक नसावेत़ आपण दुष्ट पुरूषांच्या संरक्षणाखाली राहू नये़ आपला निवास मातृभूमीच्या रक्षकांच्या छत्रछायेखाली असावा़ सज्जनांची संख्या वाढो़ राजाचा राज्याभिषेक व्हायचा़ त्याच्या पाठीवरून सिंचन करणाºया जलधारा वहायच्यात़ त्या बघून ऋषी म्हणतो़ जणू काही पर्वताच्या पृष्ठभागावरून वहाणाºया या सरिता़सामवेद तर गान विद्येचा वेद ़ गीतेने ‘वेदात सामवेद मी़’ असं म्हटलंय़ सामवेदाचा केवढा महिमा गाईलाय़ वेद ज्ञान आहे़ साम गान आहे़ गान हे भावभावनांशी समांतऱ यात भावतरंगांचा दिव्य उल्हास नांदता़ यात आढळून येते मनाची एकतान नादमुद्रा़ गायनानं माणसाचं दु:ख कमी केलंय़ स्वर साधना योगिजनांनाही भावरम्य बनवते़ संगीत म्हणजे प्रीत़संगीत म्हणजे आत्म्याची उन्नती़ स्वर्गीय सौंदर्याचं सगुण साकार रूप़ संगीत ही साधना़ संगीत ही उपासना़ संगीत हा ध्यानयोग़ वेदातील सारे मंत्र अपूर्व़ यात स्वर वसतो़ ताल नांदतो़ लय सजते़ छंद विहरतो़ गती नृत्याकार असत़े स्वर-चिकित्सा अनुपमेय़ यात विविध राग़ यात सजल्यात नृत्यमुद्रा़ यात नयनरम्य भाव़ या तत्त्वांनी संगीत सजलंय़ एकूण श्रुती बावीस़ एकूण स्वर सात़ षड्ज, ऋषभ, गांधार, पंचम, धैवत आणि निषाद़ यातून श्रुतींची मांडणी सजलीय़ या गुणांमुळं सामवेदाला पुष्प मानलं गेलं़-प्राचार्य डॉ़विश्वास पाटील़, शहादा, जि.नंदुरबार
वेद : ऋषी आणि कृषी संस्कृतीेचे उद्गान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 7:44 PM