जळगाव : वाढत्या उन्हासोबतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबूसह भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढले आहेत.गेल्या आठवड्यात २२०० ते ४८०० इतके असलेल लिंबूचे दर हे २३०० ते ४९०० इतके झाले आहेत. लिंबूसह अद्रक व भाज्यांचे दरही वाढतच आहे. अद्रकचे दर हे २१०० ते ६६०० इतके आहे. कांद्याच्या दरात फारसा फरक पडला नसून २०० ते ७०० असा दर कांद्याला मिळत आहे.पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाजी वर्गातील गिलके हे सर्वाधिका महाग अर्थात ६१०० रुपये क्विंटल दरावर पोहचले आहे, त्या खालोखाल कारले ५७०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. तर चिंचेची आवकही वाढत असून बिया काढलेली चिंचेचे दर ८०००वर आले आहे.सध्या इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. मुळे ८००, बीट १५००, शेवगा १७००, बटाटे ४०० ते ११५०, भेंडी २००० ते ४५००, गंगाफळ ६०० ते १५००, गाजर ५०० ते १०००, कैरी १००० ते ३०००, खिरा १०००, पानकोबी ५०० ते १५००, मेथी २२०० ते ५०००, पालक १४००, टमाटा १००० ते १७५०, वांगे ५०० ते ११००, हिरवी मिरची १२०० ते ३५००.
जळगावात भाजीपाल्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:39 PM