विजयकुमार सैतवालजळगाव : मानवी शरीरात जाणाऱ्या कोणत्याही पदार्थाच्या विक्रीसाठी संबंधित विक्रेत्यास खाद्य पदार्थ विक्रीबाबत नोंदणी करणे व परवाना घेणे सक्तीचे असून यात भाजीपाला विक्रेते तसेच पान टपरीधारकांचाही समावेश आहे. असे असले तरी याबाबत विक्रेत्यांमध्ये अद्यापही उदासीनता दिसून येत असून जिल्ह्यात केवळ १५ हजार परवाना धारक विक्रेते आहेत.हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे असो अथवा मोठ्या दुकानांवरील विक्रेते किंवा हॉटेल असो, या सर्वांना खाद्य पदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. या सोबतच किराणा मालाचे विक्रेते, कृषी बाजार समितीतील आडते(कमिशन घेणारे), मांस,मासे, अंडी विक्रेते, पान टपरी, बेकरी,भाजीपाला विक्रेते या सर्व घटकांनी नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गाव अथवा शहर कोठेही एका कोपºयात टपरी, हातगाडी लावून अथवा भाजीपाला विक्री सुरू केली तरी सहसा परवाना घेतला जात नाही. मात्र हे सर्व पदार्थ थेट मानवी शरीरात जात असल्याने ते विक्री होत असलेल्या ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे पालन (स्वच्छता असो वा इतर नियम) होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने या सर्व विक्रेत्यांना ही नोंदणी व परवाना सक्तीचे करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.१२ लाखावर उलाढाल असल्यास परवाना सक्तीचाज्या व्यावसायिकांची वर्षाअखेर १२ लाखांच्या वर उलाढाल आहे त्यांना परवाना घेणे बंधनकारक आहे तर ज्यांची उलाढाल १२ लाखाच्या आत आहे त्यांना नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसे न केल्यास विक्रेत्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद कायद्यायात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.घाऊन विक्रेते, उत्पादकही कारवाईस पात्रज्या किरकोळ विक्रेत्यांकडे खाद्य पदार्थ विक्रीचा परवाना नसेल त्यांना जर उत्पादक अथवा घाऊन विक्रेते माल पुरवीत असतील तर त्या घाऊक, अर्ध घाऊक तसेच उत्पादकांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत (परवाना अट १४ कलम अंतर्गत) संबंधित विक्रेते कारवाईस पात्र ठरतील, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. एखाद्या दूध विक्रेत्यास परवाना अथवा नोंदणी नसल्यास दूध कंपनीने दूध पुरविले तर त्या कंपनीवरदेखील कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.खाद्य पदार्थ परवान्याची आॅनलाईन नोंदणीखाद्य पदार्थ विक्रीचा परवाना मिळविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाच्या चकरा मारायची गरज भासत नाही. त्यासाठी आॅनलाईन नोंदणी करून विक्रेत्यांना परवाना मिळविता येतो. याचा लाभ घेत जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाय. के. बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील व अनिल गुजर यांनी केले आहे.कोणत्याही खाद्य पदार्थ विक्रीसाठी खाद्य पदार्थ विक्री परवाना अथवा तशी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास संबंधित विक्रेते व पुरवठादारही कारवाईस पात्र ठरतात.वाय. के. बेंडकुळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
भाजीपाला विक्रेते, पानटपरीधारकांनाही खाद्य पदार्थ विक्री परवाना आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:04 PM
जळगाव जिल्ह्यात १५ हजार नोंदणी
ठळक मुद्दे निम्म्याहून अधिक विक्रेत्यांची पाठखाद्य पदार्थ परवान्याची आॅनलाईन नोंदणी