शिरसोली : संपूर्ण देशात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले असताना गर्दी न करण्याचे आदेश असताना भाजी विक्रेते गल्लीत गर्दी करीत असल्याने भाजी विक्रेते व स्थानिक रहिवाशांमध्ये चांगलाच राडा झाला. दरम्यान ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त मांडल्यानंतर पोलीसांनी आदेश न पाळणाऱ्यांची चांगलीच धुलाई केली.शिरसोली प्र. नं. येथील चारनळ चौकात भाजी मार्केट आहे. एरव्ही येथे सात-आठ दुकाने नेहमीच असतात. सर्व ठिकाणी बंदचे आदेश असताना या ठिकाणी मात्र नेहमीपेक्षा दुपटीने गर्दी झाली होती. ही गर्दी टाळावी, यासाठी भाजी विक्रेत्याना विनवणी करण्यात आली. गर्दी करु नका, कोरोनाची साथ चालू आहे. शासनाचे गर्दी टाळण्याचे आदेश आहेत; परंतु कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत न ऐकणाºयांंची चांगलीच खरडपट्टी काढली. मोठा राडा होत असल्याचे पाहून पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, पप्पू बारी, गणेश बोबडे यांनी मध्यस्थी केली.रिकामटेकड्यांची पोलिसांनी केली धुलाईदरम्यान कलम १४४ लागू असताना काही रिकामटेकडे मुद्दाम गावात फिरुन संसर्ग पसरविण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत पोलीसांनी रिकाम टेकड्यांची चांगलीच धुलाई केल्याने सूज्ञ नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिरसोलीत भाजी विक्रेते रहिवाशांमध्ये राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:48 PM