शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी, रिड्रेसल सगळेच ऑनलाइन

By अमित महाबळ | Published: March 20, 2023 3:34 PM

पुढील प्रक्रिया अथवा कार्यवाहीची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाते.

अमित महाबळ

जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालानंतर होणारे फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसल आता सगळेच ऑनलाइन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी ज्यासाठी अडीच ते तीन महिने लागायचे, तीच प्रक्रिया पंधरा ते वीस दिवसांत व्हायला लागली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्ष कला, विज्ञान, वाणिज्य, बी. व्होक., बी. एस. डब्ल्यू., आदी अभ्यासक्रम वगळता इतर वर्गांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी (मूल्यमापन) ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. त्यासाठी विद्यापीठात सुसज्ज कक्ष उभारण्यात आला असून, महाविद्यालयीन स्तरावर तपासणी केंद्रे देण्यात आलेली आहेत. याच बरोबरीने निकालानंतरच्या फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसल या प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. शुल्क ऑनलाइन भरता येते. यानंतरची पुढील प्रक्रिया अथवा कार्यवाहीची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाते.

तुम्हाला अर्ज करायचाय, ही आहे मुदत

- व्हेरिफिकेशन (गुणपडताळणी) - निकाल जाहीर झाल्यापासून २१ दिवसांच्या आत- फोटोकॉपी (उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत) - निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत- रिड्रेसल (पुनर्मूल्यांकन) - फोटोकॉपी मिळाल्यापासून ८ दिवसांच्या आत.

याआधी असा असायचा वेळखाऊ प्रवास

पूर्वी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अर्ज करावा लागे. तेथून तो विद्यापीठात येई. त्यानंतर अनेक गठ्ठ्यांमधून नेमकी उत्तरपत्रिका शोधून, झेरॉक्स काढून विद्यार्थ्याला टपालाद्वारे पाठवत. झेरॉक्स मिळाल्यावर विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून मग पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचे. या सर्वांमध्ये दोन ते अडीच महिने लागायचे. या दरम्यान, पुनर्परीक्षेची संधी निघून जायची.

हा झाला बदल

व्हेरिफिकेशनसाठी (गुणपडताळणी) अर्ज केल्यावर निकाल लगेच कळतो. फोटोकॉपी ई-मेलवर येते किंवा डॅश बोर्डवरून डाऊनलोड करून घेता येते. फोटोकॉपीचा अर्ज कोणत्याही दोन विषयांसाठी करता येतो. रिड्रेसलमध्ये (पुनर्मूल्यांकन) दुसऱ्या शिक्षकाकडून उत्तरपत्रिका पुन्हा ऑनलाइन तपासल्या जातात. त्या आधीच स्कॅन केलेल्या असल्याने तत्काळ उपलब्ध होतात. यामध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाला असेल तरच सुधारित निकाल कळविला जातो.

हिवाळी परीक्षा २०२२ साठीचे अर्ज

- फोटोकॉपी - ३४१७- व्हेरिफिकेशन - २६४५- रिड्रेसल - १७२६(डिसेंबर २०२२ पासून ते आजअखेरची संख्या)

संचालक म्हणतात...फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसलच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे वेळेत बचत होत आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. दीपक दलाल यांनी दिली.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थीJalgaonजळगाव