जळगाव : कंपनीत नोकरी करणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेशी जवळीक साधून चारचाकी व लॉजमध्ये अश्लील फोटो तसेच व्हीडीओ तयार करुन तिच्यावर विजय उर्फ विक्की संजय ठाकूर (२२, रा.द्वारका नगर, शिवधाम अपार्टमेंट) याने सतत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विजय याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पीडित महिला एका कंपनीत नोकरीला आहे. सुरुताच्या काळात येण्याजाण्यासाठी या कंपनीची गाडी होती, मात्र १ जानेवारीपासून ही गाडी बंद झाली. त्यामुळे १३ महिलांनी मिळून विजय ठाकूर याची गाडी दरमहा प्रती व्यक्ती ११०० रुपये महिन्याने भाड्याने लावली. या काळात विजय याने या विवाहितेशी जवळीक निर्माण केली. मार्च महिन्यात विजय याने सोबत नोकरीला असलेल्या मैत्रीणीमार्फत विवाहिता मला आवडते व तिच्याशी मला मैत्री करायची आहे, असा निरोप पाठविला. त्यानंतर काही दिवसांनी मैत्रीणीनेच निरोप आणला की आपल्याला विजयसोबत मार्केटमध्ये जायचे आहे असे सांगितले. तेव्हा रिक्षाने मार्केटमध्ये न जाता रेल्वे स्टेशनजवळील विसावा लॉजमध्ये नेले. ही मैत्रीण बाहेर थांबली. आतमध्ये विजय याने जबरदस्ती करुन अत्याचार केला व त्याचे फोटो काढले. दीड तासानंतर बाहेर आल्यावर मैत्रीण व विवाहिता अशा दोघांना त्याने परत घरी सोडून दिले.तेव्हा मैत्रीणला लॉजमधील हा प्रकार सांगितला असता तिने तो तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून त्याने केले असेल, त्याने काही होत नाही असे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी त्याच विसावा हॉटेल तथा लॉजमध्ये नेऊन फोटो व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला.मोबाईलवर पाठविले व्हीडीओ व फोटोया घटनेनंतर विजय याने विवाहितेच्या मोबाईलवर शरीरसंबंधाचे फोटो व व्हीडीओ पाठवून चॅटींग केली. त्यानंतर हे फोटो व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चारचाकी वेळोवेळी अत्याचार केला. ५ नोव्हेंबर रोजी कंपनीतून येत असताना मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून चारचाकी मोहाडी व शिरसोली रोड परिसरातही नेले व चारचाकी अत्याचार केला. हा प्रकार असह्य झाल्याने विवाहितेन नातेवाईकांना हा सांगून मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. बुधवारी तपासाधिकारी गणेश कोळी यांनी विजय उर्फ विक्की संजय ठाकूर याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.