जळगाव : जिल्हा प्रशासनाच्यावतीने विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यात निवडणुकीसाठी नियुक्त ३४३ झोन अधिकाऱ्यांना रविवार, २२ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ३ लाख २२ हजार ३२ मतदार वाढले असून मतदानापर्यंत आणखी एक पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने या मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वेध लागले असून जिल्हा प्रशासनाच्यावतीनेदेखील याची तयारी करण्यात आली आहे. मतदार यादी प्रसिद्ध करण्यापासून मतदान केंद्र, अधिकारी, कर्मचारी नियुक्ती हे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.३४ लाख ४७ हजार १८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात ३१ लाख २५ हजार १५२ मतदार होते. त्यात आता ३ लाख २२ हजार ३२ मतदारांंची भर पडून ही संख्या ३४ लाख ४७ हजार १८४वर पोहचली आहे. ३० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ही संख्या असून मतदानापर्यंत आणखी एक पुरवणी मतदार यादी तयार करण्यात येणार असल्याने ही संख्या वाढू शकते, असे निवडणूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले.५४ सहायकारी मतदान केंद्रजिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात तीन हजार ५३२ मतदान केंद्र असून यात वाढीव मतदार संख्येमुळे ५४ सहायकारी मतदान केंद्रही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ५८६वर पोहचली आहे.३४३ झोनल अधिकारी, १८ हजार कर्मचारीविधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३४३ झोनल अधिकाऱ्यांची तर १८ हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच २०० व्हिडिओ ग्राफरही तयार ठेवण्यात आले आहेत. यातील ३४३ झोनल अधिकाºयांना रविवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नियोजनात भवनात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.२०१४मध्ये १९ टक्क्याने वाढले होते मतदान२००९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ ४५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २०१४मध्ये यात जवळपास १९ टक्क्याने वाढ होऊन ६४.२४ टक्के मतदान झाले होते. या वेळी ही टक्केवारी आणखी वाढविण्याचा मानस असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
vidhan sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात सव्वा तीन लाख मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:20 PM