ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - जि.प. व अनुदानीत, पालिकेच्या शाळांमध्ये मोफत गणवेश वितरण न करता थेट लाभार्थी विद्याथ्र्याच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.शालेय विद्याथ्र्याना मोफत पुस्तकांसह शाळेकडूनच गणवेश दिला जात होता. मात्र आता गणवेशाचे अनुदान थेट विद्याथ्र्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. प्रतिविद्यार्थी 400 रुपये या प्रमाणे हे अनुदान दिले जाईल. जळगाव जिल्ह्यात एक लाख 61 हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. लाभ घेण्यासाठी प्रथम गणवेश खरेदी करून नंतर त्याचे बिल शाळेत जमा करावे लागेल. ही एकत्रीत माहिती जि.प.कडे प्राप्त झाल्यानंतर अनुदान लाभार्थीच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान विभागाने दिली.
विद्याथ्र्याना गणवेशांचे थेट अनुदान
By admin | Published: May 18, 2017 5:20 PM