अमळनेर : लोकशाही बळकट करण्यासाठी आणि नागरिकांनी नि:पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग शाळांच्या मार्फत पालकांकडून सक्तीने संकल्पपत्र भरून घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही मतदान व निवडणूक विषयी उत्सुकता निर्माण झाली आहेमतदान जागृती करण्यासाठी, आणि जाती धर्मावर , पैशांवर निवडणूक होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांचे संकल्प पत्र भरून घेण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे.निवडणूक काळात गावतील विविध चर्चांमुळे व घडामोडींमुळे लहान मुले निवडणुकीबाबत गैरअर्थ काढत होते. मात्र पालकांपर्यंत संकल्प पत्र पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ द्यावे लागत आहे. त्यामुळे साहजिकच लहान मुलांवर निवडणूक व मतदान प्रामाणिकपणे झाले पाहिजेत असे संस्कार होत आहेत, अशी प्रतिक्रया मंगळूर माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रभुदास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी पालकांकडून भरले जातात संकल्प पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:04 PM