जळगाव : गावठी पिस्तुल व तीन जीवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी १० वाजता चौघांना शिरसोली येथे आकाशवाणी केंद्राच्या परिसरात रस्त्यावर पकडले. नरेश रवींद्र मराठे (२१), रवींद्र सिताराम अस्वार (२०), सागर सुधाकर पवार (२१) सर्व रा.शिरासोली व आकाश अरुण जोशी (२४, कंवर नगर, जळगाव) अशी चारही संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.शिरसोली येथील नरेश मराठे या तरुणाच्या कमरेला सतत गावठी पिस्तुल असते व ते पिस्तुल घेऊन तो त्याच्या तीन मित्रासह आकाशवाणी केंद्राकडे मोकळ्या जागेत फायरींगला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी प्रमोद लाडवंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर व किरण धनगर या चार कर्मचाºयांना तातडीने शिरसोली येथे रवाना केले. आकाशवाणी केंद्राच्या परिसरात वर्णनाच्या माहितीवरुन पोलिसांनी चौघांना अडवले व त्यांची चौकशी केली असता पोलिसांना मिळालेल्या नावांची खात्री झाली. नरेश याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तुल व पॅँटच्या खिशात तीन जीवंत काडतूस मिळून आली. हे पिस्तुल व काडतूस कुठून घेतल्याबाबत चौकशी केली असता आकाश जोशी याने दिल्याचे उघड झाले. हे पिस्तुल चालते की नाही याची चाचपणी करण्यासाठी आम्ही जंगलात जात होतो, असे त्यांनी तपासात सांगितले. दरम्यान, या चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायरींगला जाण्यापूर्वीच गावठी पिस्तुलसह चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:51 PM
गावठी पिस्तुल व तीन जीवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी १० वाजता चौघांना शिरसोली येथे आकाशवाणी केंद्राच्या परिसरात रस्त्यावर पकडले. नरेश रवींद्र मराठे (२१), रवींद्र सिताराम अस्वार (२०), सागर सुधाकर पवार (२१) सर्व रा.शिरासोली व आकाश अरुण जोशी (२४, कंवर नगर, जळगाव) अशी चारही संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे शिरसोलीतील घटनातीन जीवंत काडतूसही पकडले