शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुरुम वाहतुकीवरून कुसुंब्यात ग्रामस्थांनी रोखले डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:24 PM

महसूल पथकाच्या पाहणीत परवानगी व्यतिरिक्त आढळले दुसरेच डंपर, एक डंपर जप्त

जळगाव : १०० ब्रास मुरुम उपशाची परवानगी असताना गेल्या सात दिवसांपासून बेसुमार मुरुमचा उपसा होत असल्याने संतप्त झालेल्या कुसुंबा येथील ग्रामस्थांनी बुधवारी डंपर अडवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला. ग्रामस्थांच्या जीवाला धोका होत असल्याने या वेळी ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त करीत या बाबत महसूल विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या पथकाने मुरुमने भरलेले एक डंपर जप्त केले.कुसुंबा येथे खाजगी कामासाठी मुरुम लागणार असल्याने तहसीलदारांनी २६ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या दरम्यान कुसुंबा ग्रामपंचायतच्या गायरान जागेवरून १०० ब्रास मुरुम उचलण्याची परवानगी दिली. मात्र गेल्या सात दिवसांपासून दररोज दोन डंपरद्वारे मुरुमचा बेसुमार उपसा होत असल्याचा आरोप शेतकरी, ग्रामस्थांनी केला आहे.रस्त्याच्या दुरवस्थेवरून झाला संतापया मुरुम वाहतुकीमुळे सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून त्यावरून जाणे-येणे कठीण झाल्याने बुधवारी संतप्त झालेल्या कुसुंबा ग्रामस्थांनी मुरुम वाहतूक करणारे डंपर अडविले व रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच दररोज होणाऱ्या मुरुम वाहतुकीमुळे परवानगी पेक्षा जास्त मुरुमचा उपसा झाल्याचा आरोप शेतकरी, ग्रामस्थांनी केला. गेल्या सात दिवसांपासून एक डंपर दररोज ४८ ब्रास मुरुम वाहून नेत आहे. अशा प्रकारे येथे दररोज दोन डंपरद्वारे ही वाहतूक सुरू असल्याने सात दिवसांत मोठ्या प्रमाणात मुरुम येथून नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.ग्रामपंचायत अंधारातकुुसुंबा ग्रामपंचायतच्या गायरान जमिनीतूून हा मुरुम उचलण्याची परवानगी दिली असली तरी याबाबत ग्रामपंचायतला माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सकाळी डंपर अडविले त्या वेळी तेथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नीलेश ठाकरे, भावराव महाजन, देविदास पाटील, पोलीस पाटील, राधेश्याम चौधरी हेदेखील पोहचले. त्या वेळी परवानगीबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी डंपर चालकाकडे विचारणा केली.प्रांताधिकाऱ्यांकडे केली तक्रारसकाळी डंपर अडविल्यानंतरही संबंधित जुमानत नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र सर्व जणांनी आपण निवडणूक कामात असल्याचे सांगितल्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडे या विषयी तक्रार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानुसार प्रांताधिकाºयांनी महसूल पथकाला सूचना देऊन घटनास्थळी पाठविले. तहसीलदार वैशाली हिंगे, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक कुसुंब्यात पोहचले.दुसºयाच क्रमांकाच्या डंपरद्वारे वाहतूकमुरुम वाहतुकीची परवानगी देताना तहसीलदारांनी एम.एच. १९, ५३३१ व एम.एच. १९, ५६६८ या दोन वाहनांद्वारे मुरुम वाहतुकीची परवानगी दिली होती. मात्र ग्रामस्थांनी मुरुम वाहतूक करणारे डंपर अडविले त्या वेळी ते डंपर या दोनही डंपर व्यतिरिक्त एम.एच. १९, झेड ४९२३ या क्रमांकाचे निघाले. तसेच महसूल पथकाच्या पाहणी दरम्यानही परवानगी व्यतिरिक्त दुसºयाच क्रमांकाचे डंपर असल्याचे आढळून आले. त्यामुळे महसूल पथकाने मुरुमने भरलेले हे डंपर जप्त करीत ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावले असल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिली.मोजणी करणारपरवानगीपेक्षा जास्त मुरुम उचलल्याची ग्रामस्थांची तक्रार असली तरी किती मुरुम उचलला हे आत्ताच सांगता येणार नाही, त्यासाठी मुरुम उचलला गेला त्याठिकाणी मोजणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार हिंगे यांनी सांगितले.कुसुंबा येथे मुरुम वाहतुकीची तक्रार आल्याने पाहणी केली असता परवानगी ज्या क्रमांकाच्या वाहनाला परवानगी दिली होती, त्या व्यतिरिक्त दुसºयाच क्रमांकाचे डंपर आढळून आले. ते जप्त केले आहे. किती मुरुमचा उपसा झाला, याची मोजणी करण्यात येईल.- वैशाली हिंगे, तहसीलदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव