जळगाव : विमलबाई पाटील (रा.धानवड) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. जयदेव पाटील यांच्या त्या आई होत.
वामन वाघुळदे
जळगाव : वामन वाघुळदे (वय ८७, रा.सावदा) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. ते यशवंत वाघुळदे यांचे ते वडील होत.
प्रताप दंडगव्हाळ
जळगाव : प्रताप दंडगव्हाळ (वय ४९, रामेश्वर कॉलनी) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. चेतन दंडगव्हाळ यांचे ते भाऊ होत.
एकनाथ बोरसे
जळगाव : टेलिफोन विभागामधील सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ पांडुरंग बोरसे (वय ७६, रा.अर्जुन नगर) यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बी.एस.एन.एल.चे कर्मचारी जितेंद्र बोरसे यांचे ते वडील होत.
रमेश शिरूडे
जळगाव : रमेश लक्ष्मण शिरूडे (वाणी) (वय ७१, रा. गाळण, ता.पाचोरा) यांचे १४ रोजी सकाळी ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. ते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरूडे यांचे ते वडील होत.