जळगाव : जळगावात रिझल्ट मिळण्यासाठी वरिष्ठांकडे स्वातंत्र्य मागितले होते. जिल्ह्यातील गटबाजीमध्ये मला इंटरेस्ट नाही. कोणाची बाजू घ्यायला आलो नाही आणि कुणाच्या विरोधातही नाही, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जळगावचे प्रभारी विनायक देशमुख यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फटकारले. ते आढावा बैठकीत बोलत होते.
देशमुख म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा एक खासदार व चार ते पाच आमदार निवडून आणू. शिवसेना व भाजपात फूट पडली आहे. पण काँग्रेस एकसंघ आहे. ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी जळगाव शहरात पुढचा आमदार काँग्रेसचा असेल. इतरही जागा आपण मिळवू. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.
मी भाजपात जायचा संबंध नाहीमी भाजपात जायचा संबंध नाही. त्यापेक्षा घरी बसेल. सत्तेसाठी व फायद्यासाठी गद्दारी करण्याची भूमिका माझ्या रक्तात नाही. खोट्या अफवा खपवून घेतल्या जाणार असतील, तर काम कसे करायचे? आक्रोश तपासून अन्याय दूर करा अन्यथा त्यांना दूर करा किंवा आम्हाला सांगा. त्यांच्याकडे आम्ही बघू, असा इशारा आमदार शिरीष चौधरी यांनी दिला. आमदार शिरीष चौधरी भाजपात जाणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे. त्याला त्यांनी पक्षाच्या बैठकीतून उत्तर दिले. त्यांनी कोणाचे नाव घेता ही अफवा कोण पसरवत आहे हेही मला माहित असल्याचे सांगितले.
भाजपाकडून होती ऑफरपक्षासाठी काम करणाऱ्यांचे काही जणांकडून खच्चीकरण केले जात आहे. यावर पक्षाच्या नेतृत्त्वाने भूमिका घ्यावी. २०१९ मध्ये भाजपाकडून तिकीट व मंत्रिपदाची ऑफर होती. त्यांना सांगितले, की काँग्रेसने मला भरपूर दिले आहे. पक्षाने मान-सन्मान ठेवावा. नको त्या लोकांना डोक्यावर घेऊन किती दिवस नाचणार?, अशा शब्दांत आमदार चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यांना आम्ही आमचे मानत नाहीदोन-चार जणांनी म्हटले प्रदीप पवार आम्हाला नकोत. पण अध्यक्ष तळागाळातील कार्यकर्ते ठरवतात. पक्षात लोकशाही आहे. विश्रामगृहात भेटून निर्णय होत नाहीत. जे काँग्रेस भवनात येत नाहीत, त्यांना आम्ही आमचे मानत नाही. अशा व्यक्ती काम करत नाही आणि कुणाला करू देत नाहीत, अशी टीका जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली. बैठकीत तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मते मांडली.
जिल्हा काँग्रेसमध्ये बदल करणे माझा अजेंडा नाहीजिल्हा काँग्रेसमध्ये बदल करण्याचा माझा अजेंडा नाही. राजकीय स्थिती समजून घेण्यासह आगामी काळात संघटना बांधणी हा उद्देश आहे. प्रदेश अध्यक्षांसमोर वस्तुस्थिती मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी दिली. ते पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाच्या आढावा बैठकीत अनेक पदाधिकारी हजर नव्हते. असे प्रकार वारंवार घडल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असेही ते म्हणाले.