जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारच्या विरोधात घंटानाद व रस्ता रोको आंदोलन केल्याच्या प्रकरणात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्यासह २२ जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या सर्वांनी मंगळवारी न्यायालयात गुन्हा नाकबुल असल्याचे सांगितले.पेट्रोल डिझेलची भरमसाठ वाढ झाल्याने २०१६-१७ मध्ये राष्टÑवादीतर्फे शहरात राज्यशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी राष्टÑवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द विविध पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यात दोन प्रकरणात न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. मंगळवारी न्यायालयात आलेल्या सर्वांनाच न्यायालयाने गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली असता त्यांनी अमान्य असल्याचे सांगितले.राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील, गफ्फार मलिक, योगेश देसले, मंगला पाटील, कल्पना पाटील, कल्पिता पाटील, डिंपल पाटील, दीपाली योगेश पाटील, प्रतिभा शिरसाठ, परेश कोल्हे, विशाल देवकर, वाल्मिक पाटील, गणेश बुधा सोनवणे, इब्राहीम पटेल, नामदेव चौधरी,यागेश दत्तू पाटील व भगत बालाणी मंगळवारी न्यायालयात हजर झाले.नीलेश पाटीलचा अर्ज फेटाळलानीलेश पाटील यांनी गैरहजर राहण्याबाबत अर्ज दिला होता. न्यायालयाने तो रद्द करुन त्यांच्याविरुध्द वारंट जारी करुन २० आॅगस्ट हजर राहण्याचे आदेश बजावले आहे. आता पुढील कामकाज २० आॅगस्ट रोजीच होणार आहे. त्यादिवशी सर्वांनाच हजर राहण्याचे न्यायालयाने बजावले आहे. न्या.जी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात हे कामकाज सुरु आहे. सरकारतर्फे अॅड.आर.पी. गावीत यांनी आमदार सतीश पाटील, माजी खासदार जैन यांच्यासह २० जणांतर्फे अॅड. कुणाल पवार यांनी इब्राहीम पटेलतर्फे अॅड.इम्रान खान व गफ्फार मलिक यांच्यातर्फे अॅड.अजिम शेख यांनी काम पाहिले.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरण : सतीश पाटील, ईश्वरलाल जैन यांच्यासह २२ जणांविरुध्द दोषारोप दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:07 AM