जळगाव : कंजरभाट समाजातील कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील स्त्रियांना कलंकित आणि मानहानीकारक जीवन जगावे लागते. त्यामुळे इथून पुढे कंजरभाट समाजात कोणत्याही नवविवाहितेची कौमार्य चाचणी होणार नाही. ही अनिष्ट प्रथा तत्काळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती पुढाकार घेईल, असा निर्धार राज्यस्तरीय संकल्प परिषदेत करण्यात आला.अंनिस आणि जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने रविवारी कांताई सभागृहात जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद झाली. या परिषदेला जात पंचायत प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्या मनोगतानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता़ अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, कंजारभाट समाजातील किंवा इतर जाती, पोटजातीतील जात पंचायत सदस्य यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींच्या संरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा करू.>पुरुषांची चाचणीका नाही?सकाळी झालेल्या सत्रात एका महिलेने ह्यकौमार्य चाचणी केवळ महिलांचीच का? पुरूषांची का नाही? असा सवाल उपस्थित केला व अन्य महिलांचाही आवाज घुमू लागला़ पंचायतीच्या प्रतिनिधींना उत्तर देण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली़मात्र, हा वाद विवादाचा कार्यक्रम नसल्याचे सांगत आयोजकांनी त्यांना थांबविले़ त्यानंतर या वादावर पडदा पडला.
नवविवाहितेची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही; राज्यस्तरीय परिषदेत संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:48 AM