यावल, जि.जळगाव : तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या हरीपुरा येथील गरीब कुटुंबातील भूषण नामयते या १७ वर्षीय तरुणाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेनेचे आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी व मित्र परिवाराने सहकार्य केल्याने त्याला दृष्टी मिळाली आहे.महात्मा फुले योजनेची माहिती देऊन तालुक्यातील परसाळे येथील भूषण नामयते (वय १७) याचे लहानपणी डोळे आल्याने त्याच्या एका डोळ्याची दृष्टी नाहिशी झाली. तर दुसऱ्या डोळ्याने त्यास कमी दिसत होते. शिवसेनेचे आदिवासी सेलचे तालुकाप्रमुख हुसेन तडवी मित्र परिवारने परेशा तायडे, छोटू जागीरदार, आदिवासी सेल शिवसेना तालुका उपप्रमुख परमान तडवी, अरमान तडवी, वसीम तडवी, साहील तडवी यांनी आपल्या स्वखर्चाने त्यास तपासणीसाठी जळगावला दोनदा नेऊन त्याच्या डोळ्यांची तपासणी केली व महात्मा ज्योतीबा फुले योजनेमधून एका डोळ्याचे आॅपरेशन केले. यामुळे भूषण यास दृष्टी प्राप्त झाली आहे. या सर्व तरूण मित्रांचे नामयते परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावल तालुक्यातील तरुणांच्या सहकार्याने १७ वर्षीय तरुणास दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:55 PM
आदिवासी गाव असलेल्या हरीपुरा येथील गरीब कुटुंबातील भूषण नामयते या १७ वर्षीय तरुणाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेनेचे आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी व मित्र परिवाराने सहकार्य केल्याने त्याला दृष्टी मिळाली आहे.
ठळक मुद्देशिवसेनेच्या आदिवासी सेलचा पुढाकारशस्त्रक्रियेनंतर तरुणास दिसू लागलेमित्रांचे भूषणने व्यक्त केले आभार