जळगाव : मनपा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर बीएलओंमार्फत मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, अनेक मतदारांचे पत्ते सापडत नसल्याने अनेक बीएलओंकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींकडेच या मतदार चिठ्ठ्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच राजकीयपक्षाच्या प्रतिनिधींकडून केवळ आपल्याच मर्जीतील मतदारांना या चिठ्ठ्यांचेवाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे.मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधतांना कुठलीही अडचण निर्माण होवू नये यासाठी, राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना घरपोच आपल्या मतदार चिठठ्या वाटप करण्याचा निर्णय घेतला. ४०० हून अधिक बीएलओंकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.अनेक बीएलओंकडून घरापर्यंत जावून मतदारांना चिठठ्या वाटप केल्या जात असल्या तरी अनेक मतदारांचे पत्ते सापडत नसल्याने मतदार चिठठ्या त्या प्रभागातील उमेदवारांच्या प्रनिनिधींकडेच दिल्या जात आहे. तर काही बीएलओ या चिठठ्या मनपा प्रशासनाकडे जमा करत आहेत.मनपाच्या तिसऱ्या मजल्यावर मतदार चिठ्ठ्यांचे वाटपज्या मतदारांनी आपला रहिवास बदल केला आहे. अशा मतदारांच्या चिठठ्या मनपाच्या तिसºया मजल्यावर मतदारांना उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी दिली.तसेच ज्या उमेदवारांकडून मतदार चिठठ्या वाटप करताना त्यावर पक्षाचे चिन्ह किंवा उमेदवारांचे नाव आढळल्यास त्यांचावर कडक कारवाई करण्याचा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे वर्मायांनी दिल्या आहेत.मतदारांना दिले जाताहेत पैसे - मनपाकडे तक्रारमतदारांना उमेदवारांकडून मतदार चिठठ्या वाटप केल्या जात असताना पैसे देखील दिले जात असल्याची गंभीर तक्रार अखिल भारती सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारर चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, अनेक उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात असून त्यावर पक्षांचे चिन्ह व उमेदवारांचे नाव देखील टाकलेले आहे. तसेच मतदारांना या चिठ्या वाटप केल्यानंतर त्यांना एका मतासाठी काही पैसे देखील दिले जात असल्याची तक्रार घेंगट यांनी केली आहे.विरोधी मतदाराला वाटल्या जात नाही चिठ्ठ्याउमेदवारांच्या प्रतिनिधीला मतदार चिठठ्या दिल्या गेल्यामुळे त्यांच्याकडून केवळ मर्जीतल्याच मतदारांना या चिठठ्या दिल्या जात असल्याचे प्रकार देखील सध्या सुरु आहेत. जेणेकरून मतदानाच्या दिवशी अनेक मतदार मतदानापासून वंचित रहावे यामागचा हेतू आहे. याबाबत मनपा प्रशासनाने खबरदारी म्हणून बीएलओंना ज्या मतदारांचे पत्ते सापडणार नाहीत अशा मतदारांच्या चिठठ्या मनपामध्ये जमा करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.अनेक मतदारांनी आपल्या रहिवासात बदल केला आहे. त्यामुळे बीएलओंना मतदार चिठ्ठ्या वाटप करताना अनेक मतदारांच्या घरांचे पत्ते सापडत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या मतदारांना मतदार चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत. त्यांंनी मनपाच्या तिसºया मजल्यावरील निवडणूक कक्षात संपर्क साधून आपली व आपल्या कुटूंबातील सदस्यांच्या चिठ्ठ्या घेवून जाव्यात, त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.-चंद्रकांत डांगे, मनपा आयुक्त
मतदारांचे पत्ते न सापडल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिल्या जाताय मतदार चिठ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:28 PM
धक्कादायक प्रकार
ठळक मुद्देमर्जीतल्या मतदारांनाच मतदान चिठठ्यांचे वाटप होत असल्याची तक्रारविरोधी मतदाराला वाटल्या जात नाही चिठ्ठ्या