सातगाव, ता.पाचोरा : जि. प. मराठी शाळेत शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत वयस्कर मंडळी अथवा ज्यांना शेतात कामासाठी तसेच बाहेरगावी जायचे आहे अशा मतदारांची गर्दी पाहावयास मिळाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या वृद्धांनी दोन ते तीन वर्षांपासून घराचा उंबरा आणि पायऱ्या उतरल्या नव्हत्या अशा काही वृद्धांनाही लहान बाळासारखे दोन्ही हातांत उचलून मतदान केंद्रात आणलेले पाहावयास मिळाले. एका वयस्क वृद्धाने खंत व्यक्त केली की, मतदानाला अलगद उचलून नेतात तसे एखाद्या महिन्याच्या अंतराने का होईना, हवा बदल होण्यासाठी घराबाहेर फिरावयाला का नेत नाहीत?
मतदानामुळे दोन वर्षांनी घराचा उंबरा ओलांडला -वृद्धांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 16:51 IST