शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

मतदानासाठी सुटी किंवा दोन तासाची मिळणार सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 9:10 PM

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदारांना सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत निर्देश गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवार मतदान होणार आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रांमध्ये मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहणार आहे. त्यामध्ये खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान व कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव अथवा उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहणार आहे.तक्रार आल्यास कारवाई होणारउद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी व्यवस्थापनाने या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. मतदाराकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव