जळगाव : पिंप्राळा परिसरातील सेमी इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ मध्ये सकाळी ९ वाजता तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला़ यामुळे तब्बल अर्धातास मतदारांना रागेत ताटकळत उभे रहावे लागले़ सकाळी मतदानाच्या दोन तासात पिंप्राळा, गणेश कॉलनी, निमखेडी रस्ता, खोटेनगरमधील मतदान केंद्रांवर धिम्मगतीने मतदान सुरू होते़ मात्र, साडे दहा वाजेनंतर या परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी वाढलेली होती़सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली़ मात्र, मतदार चिठ्ठयांच्या घोळामुळे मतदारांमध्ये सुरूवात पासूनच संभ्रम निर्माण झाला होता़ काही मतदारांच्या मतदार चिठ्यांवर फोटो नसल्यामुळे फोटो असलेली चिठ्ठी आणावी तेव्हाच मतदान करावा सांगण्यात आले़ तर ज्यांच्या चिठ्ठयांवर फोटो नाहीत त्यांनी देखील मतदान केल्यामुळे अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या़ पिंप्राळा रिक्षा स्टॉपवर उमेदवारांसह कार्यकर्त्यांची सकाळपासूनच गर्दी होती़ शंभर-शंभर मीटर अंतरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता़
पिंप्राळा परिसरात मतदान यंत्र बंद, मतदार अर्धा तास ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:16 PM