चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वडगाव, ता.रावेर येथील शेतकरी दगडू उखर्डू पाटील या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेलचा पुनर्भरण उपक्रम राबविला.दगडू पाटील यांनी आपल्या सावदा-रावेर या हमरस्त्यावर वडगाव गावानजीक असलेल्या स्वत:च्या शेतात बोअरवेलच्या आजूबाजूला चार बाय चारचा खड्डा खोदला. शेताला व बोअरवेलला लागून असलेला नाला तसेच रस्त्यावरील वाहून जाणारे पाणी शेतात जिरवण्यासाठी प्रयत्न केले. यातून बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.जमिनीतील भूगर्भातील पातळी दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे. याचा फटका आमच्या वडगाव शेती शिवारातही बसत आहे. आज रोजी पावसाचे नाल्यातून रस्त्यातून वाहून जाणारे पाणी बोरवेलच्या आजूबाजूने खड्डा खोदून त्यात जिरवण्याची कल्पना मला सुचली, याचेच अनुकरण इतर शेतकऱ्यांनी केल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ होऊ शकते.-दगडू उखर्डू पाटील, शेतकरी, वडगाव, ता.रावेर
वडगावच्या शेतकऱ्याने स्वखर्चाने राबवला बोअरवेल पुनर्भरण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 5:53 PM