लोकमत ऑनलाईन अडावद ता.चोपडा, दि.21 : दारुबंदीसाठी लढा देत पोलिसांच्या मदतीने गावात 100 टक्के दारुबंदी यशस्वी करणा:या आडगाव येथील महिलांचा भाऊबिजेच्या दिवशी साडी- चोळी देऊन अडावद पोलिसांनी व ग्रामस्थांनी सत्कार करत गौरव केला. 21 रोजी सकाळी 10-30 वाजता वडगाव येथे हा कार्यक्रम झाला. पोलिसांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजीत करुन दारुबंदीसाठी लढणा:या रणरागीणींना भाऊबिजेची अनोखी भेट दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव येथील माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, जि.प.सदस्या ज्योती पाटील, सपोनि जयपाल हिरे, पोउनि गणेश कोळी, सरपंच दीपक पाटील, पोलीस पाटील किरण पाटील, प्रा. संदिप पाटील, राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वडगाव ब्रुद्रूक येथील महिला सुमारे 4 महिन्यापूर्वी गावात दारुबंदी करण्यासाठी एकवटल्या. यासाठी त्यांना अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि जयपाल हिरे यांनी मार्गदर्शन केले. गावातील 21 महिलांची सर्वानुमते निवड करीत दारुबंदी समितीचे गठन केले. अन् तेथुनच गावाची दारुबंदीकडे वाटचाल सुरु झाली. या महिलांनी दारु विक्रेत्यांना पोलिसांच्या साह्याने अद्दल घडवून गावात 100 टक्के दारुबंदी केली. महिलांच्या या स्वयंस्फूर्तीने शक्य झालेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी अडावद पो. स्टे.चे सपोनि जयपाल हिरे यांनी शनिवारी वडगाव येथे कार्यक्रम आयोजित करुन या महिलांना पोलीस व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या आपुलकीने साडी-चोळी देऊन भाऊबीजेची भेट दिली. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत महिलांचे कौतुक केले. यांचा झाला सन्मान दारुबंदी समितीच्या अध्यक्षा निर्मलाबाई कोळी, अहिल्याबाई खेमकर, सुनंदाबाई कोळी, कमलबाई कोळी, वजंताबाई खेमकर, कौशल्याबाई कोळी, जनाबाई कोळी, जिजाबाई कोळी, कल्पनाबाई पाटील, तिरोणाबाई साळुंके, मंगलाबाई कोळी, आशाबाई कोळी, हिराबाई पाटील, ललिताबाई पाटील, सुरेखा साळुंखे, वंदनाबाई साळुंखे, आक्काबाई कोळी, सखूबाई साळुंके, कमलबाई पाटील, शालूबाई पाटील, किरण पाटील या 21 महिलांचा यात समावेश होता. यावेळी माजी सरपंच गोकुळ पाटील, चुडामण पाटील, प्रभाकर पाटील, लक्ष्मण पाटील, दिनकर पाटील, मनोहर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वडगावला दारूबंदी करणा:या महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 7:02 PM