लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाघुर धरण प्रकल्प विभागामार्फत धुळे सुरक्षा रक्षक मंडळाला सुरक्षा रक्षक यांच्या नावाची पाठवण्यात आलेल्या शिफारस प्रस्तावामध्ये प्रत्यक्ष काम करणारे सुरक्षा रक्षक व वारसांना डावलुन त्यांच्या ऐवजी इतरांच्याच नावाची शिफारस करण्यात आली असल्याचा आरोप स्वाभिमानी रयत आंदोलन या संघटनेने केला आहे.
याबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबतची तक्रार कामगार आयुक्तांकडे देखील करण्यात आली होती. येथे जे सुुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नव्हत्या. तसेच त्यांना तुटपुंज्या वेतनात १२ तास काम करून घेतले जात होते. असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.