जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ ला समांतर रस्ते तसेच या महामार्गाला ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यासाठीचा १३९ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ‘नही’मार्फत तयार करून तो मंजुरीसाठी ‘नही’च्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीची केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले जात असले तरीही सोमवार, २३ रोजी तब्बल महिना पूर्ण होऊनही त्यास मंजुरी मिळालेली नाही.डीपीआरला मंजुरीची प्रतीक्षाशहरातील निरपराध नागरिकांचा बळी घेणाºया महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. समांतर रस्त्यांसाठी शासनाकडून निधी जाहीर होऊनही दरवेळा डीपीआरच्या प्रक्रियेत अडकून नंतर बदल झाल्याने हा विषय रखडला आहे. यापूर्वी ४४४ कोटींचा डीपीआर, त्यानंतर १०० कोटींचा डीपीआर, त्यानंतर १२५ कोटींचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्षा १३९ कोटींचा डीपीआर सादर होणे अशा रितीने सातत्याने घोळ सुरू आहेत. आता नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दीड-दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत १०० ऐवजी १२५ कोटींचा डीपीआर बनविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ‘नही’ने १३९ कोटींचा डीपीआर वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे आता त्याच्या मंजुरीत अडथळे यायला नकोत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच २३ मार्च रोजीच हा डीपीआर मंजुरीसाठी पाठविण्यात आला असताना व डीपीआर मंजुरीची केवळ औपचारीकता आहे. विषय आधीच मंजूर असल्याचे सांगितले जात असताना अद्यापही डीपीआरला मंजुरी मिळालेली नाही.मंजुरी मिळताच निविदा प्रक्रियायासंदर्भात ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता डीपीआर मंजुरीसाठी पाठविला असून त्यास मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितले.
महिना उलटूनही राष्टÑीय महामार्ग समांतर रस्ते डीपीआर मंजुरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:22 PM
लेखी आश्वासनाची मुदत महिनाअखेरीस संपणार
ठळक मुद्दे अपघातांची मालिका सुरूच जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाचे काय?